Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत   Deshdoot Times
 स्पर्धेतून पोलीस दलाची कार्यक्षमता वाढणार : ना. चव्हाण   रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू   राष्ट्रवादीतर्फे आठवलेंना महापौरपदाची ऑफर   जगभरात ४६ पत्रकारांच्या हत्या   Updated on February 23, 2012, 07:35:32 hrs



मुख्य पान | आचारसंहिता भंगाच्या पाच तक्रारी
आचारसंहिता भंगाच्या पाच तक्रारी
nashik(13-February-2012)
Tags : Nashik,Maharashtra,code of conduct, crime, complaint
 

महापालिकेच्या निवडणूक शाखेला आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या पाच तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये महापालिका कर्मचारी उमेदवाराचा प्रचार करीत असल्याची तसेच भंडारा आयोजनाबद्दल तक्रार करण्यात आली आहे. अशोक मेतकर यांनी यासंदर्भात तक्रार केली असून महापालिकेच्या जुने नाशिक भागातील कथडा रुग्णालयातील एक सफाई कर्मचारी त्याच भागातील एका उमेदवाराचा प्रचार करीत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. देवळाली गावातील भीमराव गांगुर्डे यांनी भंडारा आणि महाप्रसादाबद्दल तक्रार केली आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक इच्छुकांच्या वतीने भंडारा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मतदार एखाद्या उमेदवाराकडे आकर्षित होऊ शकतात. त्यासाठी मंदिराचे जे विश्‍वस्त आहेत त्यांनी अशा भंडार्‍यावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नाशिक फेस्टिव्हलचे आयोजन केल्याप्रकरणी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात शांतीलाल बोरसे यांनी तक्रार केली होती. त्या प्रकरणी भुजबळांना नोटीस पाठविण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.


प्रिंट काढा