|
| भाजपची यादी आज जाहीर होणार |
|
| nashik(13-February-2012) |
Tags : Nashik,Maharashtra,list of BJP candidates, zilla council election 2012 |
प्रचारासाठी बड्या नेत्यांची उपस्थिती
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी शिवसेना -भाजपा यांच्यात युती निश्चित झाल्यानंतर उद्या (दि.२८) भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब आहेर यांनी दै. ‘देशदूत’शी बोलताना सांगितले.
महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी स्वबळावर लढणारे सेना -भाजप जिल्हा परिषदेची निवडणूक युतीने लढणार आहेत. निफाड, दिंडोरी आणि मालेगाव हे तीन तालुके वगळता युती झाल्याचे आहेर यांनी सांगितले. युतीचा तिढा सुटल्याने कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर झाला आहे. आता पुढील प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी इच्छुकांच्या मुलाखतीचा टप्पा यापूर्वीच पार पाडला. तथापि, युतीचा निर्णय प्रलंबित असल्याने यादी जाहीर करण्यास विलंब होत होता.
भाजपाने काही ठिकाणी उमेदवारही जाहीर केले आहेत. उद्या शनिवारी सायंकाळपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे आहेर यांनी सांगितले.
|
प्रिंट काढा |
|
|
|