Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत   Deshdoot Times
 स्पर्धेतून पोलीस दलाची कार्यक्षमता वाढणार : ना. चव्हाण   रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू   राष्ट्रवादीतर्फे आठवलेंना महापौरपदाची ऑफर   जगभरात ४६ पत्रकारांच्या हत्या   Updated on February 23, 2012, 07:35:32 hrs



मुख्य पान | उमेदवारीच्या प्रतीक्षेत इच्छुकांची वाढली धडधड
उमेदवारीच्या प्रतीक्षेत इच्छुकांची वाढली धडधड
nashik(13-February-2012)
Tags : Nashik,NMC election 2012, application form
 

मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्रीला प्रारंभ झाल्यानंतर उमेदवारी अर्ज खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाच्या आदेशाची वाट पाहताना इच्छुकांची धडधड वाढलेली दिसून येत आहे. शहर परिसरातील सर्वच पक्षांच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यात प्रत्येकाला नगरसेवक होण्याचे स्वप्न पडू लागले आहे. पक्षाच्या काही नेत्यांच्या पाठबळावर त्यांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे. छोट्या- मोठ्या कार्यकर्त्यांशी सलगी ठेवणे, मतदार याद्यांची छाननी करणे, मोबाईलद्वारे शुभेच्छा संदेश, मतदारांच्या भेटींच्या वाढत्या फेर्‍या गतिमान झालेल्या आहेत. विविध भागातील जेवणावळींनाही काही प्रमाणात सुरुवात झालेली आहे. सणांच्या शुभेच्छापत्रांसोबत भेटवस्तू वाटप करण्यासाठी इच्छुक पुढे आलेले आहेत. त्यात पत्रक, माहितीपत्रके छपाई, मतदार याद्यांची छाननी करणारे स्वॉफ्टवेअर उपलब्ध करून देणार्‍यांचा व्यवसाय जोरात आहे. त्यांच्या बळावर नेत्यांभोवतीची उठबस वाढलेली आहे. मात्र प्रत्येक पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी वाढलेल्या गर्दीत नव्याने दाखल झालेल्यांनाही नगरसेवकाचे स्वप्न पडू लागले आहे. मागणीच्या या गर्दीतून ‘खरा हिरा’ शोधताना नेत्यांचीही दमछाक होत आहे. उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्यामुळे इच्छुकांच्या काळजाचा ठोका चुकू लागला आहे. यात भर म्हणनू परिसरात पसरणार्‍या अफवांमुळे इच्छुकांमध्ये कमालीची चलबिचल दिसून येत आहे. उमेदवारासोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड दबावाचे वातावरण आहे.


प्रिंट काढा