|
|
|
|
| मुख्य पान | कडाक्याच्या थंडीने देवळाली गावात एकाचा बळी |
| कडाक्याच्या थंडीने देवळाली गावात एकाचा बळी |
|
| nashik(23-January-2012) |
Tags : Nashik,Maharashtra,winter, coldness, death due to winter |
गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने नाशिकसह नाशिकरोड परिसरात कहर केला असून रोज परिसरातील तपमान कमीजास्त होत आहे. परिणामी या थंडीमुळे देवळाली गाव येथील वालदेवी नदीच्या किनार्यावर झोपलेल्या एका इसमाचा गारठून दुर्देवी मृत्यू झाल्याचा प्रकार घडला.
देवळाली गाव येथील वालदेवी नदीच्या किनार्यार परवा रात्री एक ४० वर्षीय इसम कडाक्याच्या थंडीने गारठून मृत्यूमूखी पडल्याची घटना घडली. सदरचा थंडीने मरण पावलेला इसम हा अनोळखी असून त्याचे वर्णन पुढील प्रमाणे - अंगात सफेत रंगाचा शर्ट, चॉकलेटी रंगाची पँट, उंची पाच फुट, रंग काळा सावळा असे त्याचे वर्णन आहे. या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास नाशिकरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक धनराज दायमा यांच्या मार्गदर्शना खाली हवालदार ढगे हे करीत आहेत. दरम्यान कडाक्याच्या थंडीने गारठून मरण पावलेल्या सदरच्या इसमाची नाशिकरोड पोलिसांनी त्याच्या खिशात असलेल्या कागदपत्रांच्याद्वारे माहिती घेतली असता सदरचा इसम हा अकोला येथील राहणारा असल्याचे समजते व हा इसम काही कामानिमित्त देवळाली गाव येथे आला होता. मात्र याबाबत अधिक तपशिल मिळू शकला नाही.
|
प्रिंट काढा |
|
|
|