Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:27:17 hrs

मुख्य पान | सौरऊर्जेचे 35 लाखांचे कंदील वाटप सात तालुक्यात ‘अंधारात’
सौरऊर्जेचे 35 लाखांचे कंदील वाटप सात तालुक्यात ‘अंधारात’
Nasik(11-March-2010)
Tags : Nashik,News,Regional
 

नाशिक, दि. 10 (जि.प. प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत ग्रामीण भागात भारनियमनावेळी उपयुक्त ठरणारे सौर ऊर्जेवरील कंदील वाटप योजना सात तालुक्यात अंधारात सापडण्याची चिन्हे आहेत. संबंधित मक्तेदाराने गेल्या तीन महिन्यांपासून वारंवार कळवूनही या सात तालुक्यात सौर ऊर्जेवरील कंदीलांचे वाटप केलेले नाही. एका जिल्हा परिषद सदस्याच्या दूरच्या नातलगाकडे हे कंदील पुरविण्याचे कंत्राट असल्याने कंदील वाटपाची योजना गडद ‘अंधारात’ सापडण्याची चिन्हे आहेत. ग्रामीण भागात विजेच्या भारनियमनामुळे सौर ऊर्जेवरील सौर कंदिलांना मागणी वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत चालूवर्षी मागासवर्गीय शेतकर्‍यांना 10 टक्के लोकवर्गणी घेऊन सौरकंदील पुरविण्याच्या योजनेसाठी 35 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सौरकंदील पुरविण्याचा ठेका घेणार्‍या संबंधित मक्तेदाराने जिल्ह्यातील सात तालुक्यात या योजनेतून एकाही कंदिलाचा पुरवठा केलेला नसल्याचा आरोप शिवसेेनेच्या एका सदस्याने केला. गेल्या तीन महिन्यांपासून समाजकल्याण विभागामार्फत या मक्तेदाराला साधी नोटीसही बजावण्याची कार्यवाही विभागाने केलेली नसल्याचा आरोप या सदस्याने केला आहे. जिल्हा परिषदेच्या एका सदस्याचा दूरचा नातलग हा मक्तेदार असल्याने विभागाने कारवाईचा हात आखडता घेतल्याची चर्चा आहे. मुळात या खरेदीत आणि पुरवठ्यात अर्थपूर्ण घडामोडी घडल्या असल्यानेच पुरवठादारावर कारवाई होत नसल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. 31 मार्च संपण्यास आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहिल्याने हे कंदील वाटप व्हायचे तरी कधी आणि हा खर्च व्हायचा तरी कधी असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आलेली ताडपत्री खरेदीची चर्चा शमते न शमते तोच आता पुन्हा सौरकंदील पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


प्रिंट काढा