Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:44:36 hrs

मुख्य पान | नाराज होईल त्या दिवशी मंत्रिमंडळातून बाहेर पडेन - कदम
नाराज होईल त्या दिवशी मंत्रिमंडळातून बाहेर पडेन - कदम
Mumbai(10-March-2010)
Tags : Nashik,News,Regional,Political,National,Maharashtra
 

मुंबई, दि. 9 (अनिकेत जोशी) - ‘मी वाघासारखा फिरतो आणि सिंहासारखे काम करतो, शिकार टप्प्यावर आल्याशिवाय करायची नसते हे वाघाला आणि सिंहाला बरोबर माहित असते... खाते कुठलेही मिळो, समाधानी आहे म्हणून मंत्रिमंडळात आहे. समाधानी नसेल त्या दिवशी मंत्रिमंडळाबाहेर पडेन’ हे उद्गार आहेत वनमंत्री पतंगराव कदम यांचे. कदम यांच्यावर कञेंद्रीय मंत्री जयराम रमेश आणि कॉंग्रेस खासदार विलास मुत्तेमवार यांनी अलिकडेच टीका केली होती. कदम आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात बराच वाद आहे अशाही बातम्या झळकल्या होत्या. या सर्व संदर्भात आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत कदम यांनी वाघ-सिंहाच्या उपमा देत स्पष्ट केले की केंद्रीय मंत्री रमेश वा मुख्यमंत्री चव्हाण यांनी माझ्या विरोधात काहीच टिप्पणी केली नाही आणि मुत्तेमवार यांनी मी नागपुरला जाऊनच उत्तर दिले आहे. मुत्तेमवार का बोलत आहेत हेही तुम्हाला माहिती आहे, अशा शब्दात कदम यांनी मुत्तेमवार यांना फटकारले. ‘अत्यंत कमी महत्त्वाचे मानले जाणारे वनखाते मिळाले म्हणून नाराज आहात का?’ अशी विचारणा केली तेव्हा कदम म्हणाले की, मी समाधानी आहे, म्हणूनच मंत्रिमंडळात आहे! ज्या दिवशी समाधानी नसते तेव्हा मी मंत्रिमंडळातून बाहेर पडेन! कदम म्हणाले की सिंहगड, शिखर शिंगणापूर, आगाशी गड आणि तोरणमाळ या ठिकाणांचा विकास वन पर्यटन स्थळे म्हणून करण्यात येईल. गावित म्हणाले की, वन पर्यटनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा विचार सुरू आहे. या संदर्भात दोन्ही खात्यांच्या अधिकार्‍यांना आठ दिवसात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. सिंहगड किल्ला व परिसराच्या विकासाच्या चार कोटी रू. च्या योगनेरा केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे, असेही कदम म्हणाले.


प्रिंट काढा