नाशिक, दि. 9 (सांस्कृतिक प्रतिनिधी)- कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणा-या गोदावरी गौरव पुरस्कारांचा प्रदानसोहळा उद्या (दि.10) महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी 6 वा. होणार आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते संपन्न होणा-या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणा-या प्रसिद्ध शाहीर साबळे (नाट्य),इंदिरा गांधी राष्ट्ीय मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले (ज्ञान), 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी लाखो नागरिकांचा प्राण वाचविणारे रेल्वेचे उद्घोषक विष्णू झेंंडे (साहस), ख्यातनाम सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफरखान (संगीत), ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते (चित्र), भोपाळ गॅसपीडित महिला उद्योग संघटनेच्या माध्यमातून भोपाळ वायुगळतीमुळे निराधार झालेल्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झटणारे अब्दुल जब्बार खान (लोकसेवा) यांना अकरा हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र स्वरूपात देण्यात येणार आहे. |