Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:51:07 hrs

मुख्य पान | लाचखोर विद्युत वितरण अभियंता दुसर्‍यांदा जाळ्यात
लाचखोर विद्युत वितरण अभियंता दुसर्‍यांदा जाळ्यात
Nasik(09-March-2010)
Tags : Nashik,News,Regional
 

नाशिक, नामपूर दि.8 (प्रतिनिधी/वार्ताहर)- चौदा वर्षापूर्वी पाचशे रुपयांची लाच घेतांना पकडला गेलेला आणि यासंदर्भातील खटला न्यायालयात प्रलंबित असताना विद्युत वितरण कंपनीचा नामपूर येथील दुय्यम अभियंता नरेंद्र विठ्ठल सोनजे यास आज (दि.8) नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुसर्‍यांदा पाचशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी साडेतीन वाजता दुय्यम अभियंता नरेंद्र विठ्ठल सोनजे यांना नामपूर (ता. सटाणा) येथील विद्युत वितरण कंपनीच्या उपविभाग कार्यालयात लाच घेतांना पकडले. तीन फेजचे विद्युत कनेक्शन मंजूर करण्यासाठी सोनजे यांनी पाचशे रुपयांची लाच घेतली. तक्रारदार छगन शंकर गांगुर्डे रा. ताहराबाद (सटाणा) यांच्या तक्रारीवरून हा सापळा पोलीस निरीक्षक एच. व्ही. गिरमे, जे. एम. पाटील, पोलीस नाईक रेवगडे, भारत पाटील, नंदलाल बहिरम, चालक कचरे यांच्या पथकाने यशस्वी केला. यातील तक्रारदार छगन शंकर गांगुर्डे यांच्या आईच्या घरी गृहउद्योगासाठी घरगुती वापराकरिता तीन फेजचे कनेक्शन मंजूर करण्यासाठी नामपूर उपविभागाचे दुय्यम अभियंता सोनजे यांनी पाचशे रुपयांची मागणी केली होती. या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी आरोपी सोनजे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अभियंता नरेंद्र विठ्ठल सोनजे यांना सन 1996 मध्ये नांदगांव येथे नियुक्तीस असतांना महादू सांगू सानप रा. वेहेळगांव, ता. नांदगांव यांच्या तक्रारीवरून पाचशे रुपयांची लाच घेतांना पथकाने पकडले होते. यातही तक्रारदार याच्या विहिरीवर इलेक्ट्रीक मोटार कनेक्शन मंजूर करण्यासाठी 22 जून 1996 रोजी पाचशे रुपये लाच घेतांना जाळ्यात पकडण्यात आले होते. त्यासंदर्भात नांदगांव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. हा खटला मालेगांव येथील विशेष न्यायालयात दाखल झालेला असून ही केस सध्या प्रलंबित आहे. असे असतांना सोनजे दुसर्‍यांदा जाळ्यात सापडल्याने त्याच्याबद्दल आता वेगवेगळे किस्से ऐकायला मिळत आहेत.


प्रिंट काढा