नेवासा नगरपंचायत निवडणूक : दुपारी २ वाजेपर्यंत ५५ टक्के मतदान

0

बुधवारी सकाळपासून नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदारांनी मोठ्या उत्साहात सकाळपासून मतदानासाठी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या़.

दुपारी २ वाजेपर्यंत ५५ टक्के मतदान झाले आहे़.

नेवासा नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी बुधवारी सकाळीच मतदान सुरु झाले़.

संवेदशील ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून दुपारपर्यंत शांततेत मतदान झाले़.

उन्हाचा तडाखा असल्याने सकाळीच मतदान करून घेण्याकडे मतदारांचा कल जाणवला़, मतदान प्रक्रियेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी निवडणूक यंत्रणा दक्ष असून राज्य राखीव दलासह पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*