येत्या 4 वर्षात डेबिट, क्रेडीट कार्ड कालबाह्य होणार : नीती आयोग

0

येत्या 4 वर्षाच्या काळात डेबिट व क्रेडिट कार्ड सोबत एटीएम मशीन्ससुद्धा कालबाह्य होतील असे भाकीत नीती आयोगचे  सीईओ अमिताभ कांत यांनी वर्तवले आहे.

ते पुढे म्हणाले, लोक सर्व वित्तीय व्यवहार आपल्या मोबाईलवरून करण्यास प्राधान्य देतील. शनिवारी नोएडा येथील एमिटी यूनिवर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली त्यावेळी ते बोलत होते.

विविध विषयावर आपले मत व्यक्त करत कांत यांनी देशाच्या लोकसंख्येवरही भाष्य केले, ते म्हणाले, भारताची लोकसंख्या हि इतिहासातील सर्वात मोठ्या संक्रमण काळातून जात आहे. आपली 72 टक्के लोकसंख्या 32 वर्षाची आहे. आपली लोकसंख्या तरुण होत आहे तर या उलट अमेरिका व युरोपची लोकसंख्या वृद्ध होत आहे.

आपल्याला सतत नवीनतेच ध्यास असणा-या समाजाची रचना करायची आहे.

LEAVE A REPLY

*