#NEET : नीट परीक्षेचा निकाल जाहीर

0

वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

सीबीएसईच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

नीट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे आदेश 12 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर आज नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र सरकारने केवळ एमबीबीएस नव्हे, तर सर्वच वैद्यकीय प्रवेशांसाठी ‘नीट’चा गुणवत्ताक्रम लागू केला आहे. दरम्यान, सदरील परीक्षेचा निकाल ८ जून रोजी अपेक्षित असताना मद्रास उच्च न्यायालयाने निकालालाच स्थगिती दिली. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता.

LEAVE A REPLY

*