घोटीजवळ रेव्हपार्टी : आरोपीत संगमनेरच्या एका तरुणाचा समावेश

0

अर्धनग्नावस्थेत होते तरुण-तरुणी

इगतपुरी – बलायदुरी ता. इगतपुरी येथील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलात काल रात्री उशिरा इगतपुरी पोलिसांनी तोकड्या कपड्यातील 15 जणांना ताब्यात घेतले आहे. या हॉटेलमधून सात अल्पवयीन मुलींनाही ताब्यात घेतले आहे.
अटक केलेल्यांपैकी काही जण पुण्यातील एका कंपनीचे संचालक असून पार्टीत सामील असलेल्या नृत्य करणार्‍या मुली अल्पवयीन असल्याने बालिकांचे लैंगिक  अपराधापासून संरक्षण (पॉस्को) कायद्याखाली संशयितांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधील मनोलीच्या तरुणाचा समावेश आहे. तो व्यवस्थापक म्हणून काम करीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या सर्वांवर विनापरवाना नृत्य करायला लावणे, महिलांशी बीभत्स वर्तन, विना परवाना रिसॉर्टमध्ये मद्यपार्टी आयोजित करणे असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हॉटेलचा मालक हा मुंबईतील असून या प्रकरणी तेथील मॅनेजरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निसर्गसौंदर्याने विपुल असलेल्या इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या हॉटेल व्यवसायातील असभ्य संस्कृतीमुळे पुन्हा एकदा तालुका चर्चेत आला आहे.
महामार्गापासून 2 किमी अंतरावर असलेल्या ग्रामीण वातावरणातील हॉटेलबाबत यापूर्वी अनेक तक्रारी असल्याने इगतपुरी पोलिसांनी अचानक कारवाई केली. संबंधित हॉटेल मालक दडपशाही करून ग्रामीण जनतेच्या जमिनी घशात घालीत असल्याच्याही तक्रारी आहेत.
पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश मांडवे, महिला सहायक पोलीस निरीक्षक आर. आर. पांढरे यांच्यासह पोलीस हवालदार लोहरे, विनोद गोसावी, गणेश वराडे, सचिन देसले, हेमंत मोरे, मारुती बोराडे, साहारे आदींच्या पथकाने रेन फॉरेस्ट रिसॉट येथे धाड टाकली असता तेथे तोकड्या कपड्यात व तेही मद्य पीत नृत्य करीत असल्याचे आढळून आले.
इगतपुरीचे पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयित प्रशांत काशिनाथ सोंडकर (वय-27 ) रा. दीडहार, ता. भोर, पुणे. विश्वास विठ्ठल सोंडकर (वय-45) रा. मांगालेवाडी, कात्रज, पुणे, गंगाधर भाऊसाहेब शिंदे (वय-42) रा. मनोली ता. संगमनेर, नगर, अनंत हरिहर भाकरे (वय-51) लिबर्टी हाईट्स, नाशिक, उमेश जिभाऊ शेवाळे (फरार) सर्व जी. एम. बायोसाईट्स प्रा. लि. कंपनीचे संचालक आहेत.
तर संजय वसंत सोनवणे (वय-38) पाथर्डी फाटा, नाशिक. प्रथमेश संजय सोनवणे (वय-20). रामकृष्ण एकनाथ सांगळे (वय-20) रा. मोरवाडीगाव नाशिक यांना अटक करण्यात आली आहे.सर्व आरोपींची इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणी सुरू आहे. कारवाईत पोलिसांनी डीजे साहित्य, एक कार आदी जप्त केले आहे.

LEAVE A REPLY

*