नवी मुंबईतील बॅक ऑफ बरोडा प्रकरणाचा २१ दिवसांत उलगडा; तीन राज्यातून १० संशयित ताब्यात

0
नवी मुंबई | बॅक ऑफ बरोडा दरोडा प्रकरणातील आरोपीना अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश
आले आहे. सानपाडा सेक्टर ११ मधील बॅक ऑफ बरोडावर भुयार खोदून दरोडा टाकण्यात आला होता. त्यातील काही संशयितांना मालेगाव आणि नाशिकयेथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज इतर संशयितांना ताब्यात घेऊन २१ दिवसानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

शनिवार-रविवार दोन सुट्टीचे दिवस बघून दरोडेखोरांनी डाव साधला होता. १३ नोव्हेंबरला बॅक उघडल्यावर दरोड्याचा प्रकार उघडकीस आला होता त्यानंतर मुंबई पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत होते.

भक्ती रेसिडन्सी या इमारतीमध्ये बॅक ऑफ बरोडाची जुईनगर शाखा असून त्याच इमारतीच्या शॉप क्रं ७ मधील बालाजी जनरल स्टोअर्समधून हे भुयार खोदण्यात आले होते.

पाच ते बारा फुट खोल, अडीच फुट रूंद आणि अंदाजे ४५ ते ५० फुट लांबवर हे भुयार खोदण्यात आले होते.  बालाजी जनरल स्टोअर्स हे शरद कोठावळे यांच्या मालकीचे असून ते गेनाप्रसाद यांना चार महिन्यापूर्वी भाड्याने देण्यात आले होते.

भुयार खोदताना माती पसरू नये यासाठी भुयारात सर्वत्र लाकडी प्लाय लावण्यात आले होते. बॅकेत एकूण २३७ लॉकर असून त्यातील ३० लॉकर तोडण्यात आले होते.

त्यातून सुमारे ७० हून अधिक लॉकर तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला होता. त्यामध्ये ३० लॉकर फोडण्यात त्यांना यश आले.

याप्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली असून अन्य त्यांचा साथीदार गेनाप्रसाद हा दरोडा टाकण्यापूर्वीच एक महिना अगोदर मेंदूच्या आजाराने मयत झाला होता.

याप्रकणी आतापर्यंत  श्रावण हेगडे, मोईन खान, हाजी अली मिर्झा बेग,  अंजन मांझी उर्फ अंजु यांना गोवंडी बैंगनवाडीतून अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इर्टीगा व काही दागिनेही हस्तगत केली आहेत.

संजय वाघ हा मालेगावचा सोनार असून त्यास या दरोड्यातील सोने विकले होते. मोईद्दीन शेख यास कोलकाता हावडा येथून अटक केली आहे.

किशन मिश्रा यास उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. शुभम वर्मा यास अलाहाबाद येथून अटक केली आहे. आदेश वर्मा यासही नवी मुंबई पोलिसांनी अलाहाबाद येथून अटक केली आहे.

हाजी अलीची बहीण मेहरून्निसा हिला पुण्यातून अटक केली आहे. दहा संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सात किलो सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये दरोडा पडला असला तरी अशा प्रकारे बॅॅकेवर दरोडा टाकावा यासाठी दरोडड्यातील मुख्य संशयित आरोपी हाजी अली मिर्झा बेग २०१४ पासूनच दरोड्यासाठी जुळवाजुळव व बॅकेचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

अटकेत असलेल्या दहा संशयितापैकी सहा जणांना महाराष्ट्रात, तीन जणांना उत्तर प्रदेशात तर एकाला कोलकता येथून ताब्यात घेतले आहे.

मोठी बातमी : मुंबई बँक दरोडा प्रकरणात नाशिकमधील तीन व्यावसायिक?

बडोदा बँक भुयार दरोड्याप्रकरणी मालेगावच्या सुवर्ण कारागिराला अटक

Photo Gallery : भूयार बनवून बँक ऑफ बडोदाचे लॉकर असे फोडले; पाहा ही छायाचित्रे

LEAVE A REPLY

*