कर्जमाफी मिळाल्याबद्दल नवापूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा जल्लोष

0
नवापूर । दि.15 । प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांच्या विविध संघटनांनी शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी सुरु केलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला यश मिळून कर्जमाफी मिळाल्याबद्दल नवापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
महाराष्ट्र राज्यात गेल्या अधिवेशनापासून शेतकर्‍यांच्या विविध संघटनांनी तसेच विविध पक्षांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन सुरु केले होते.
काही पक्षांनी सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा काढली तर काही पक्ष शेतकर्‍यांबरोबर रस्त्यावर उतरले. तसेच पुणतांब्याच्या शेतकर्‍यांनी 1 जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता.

या निर्णयाला संपूर्ण राज्यातून शेतकर्‍यांनी पाठींबा दिला. या आंदोलनाला अधिक तीव्र करण्यासाठी शेतकर्‍यांच्या सर्व संघटना एकत्र येवून तीव्र आंदोलन करीत महाराष्ट्र सरकारला कर्जमाफिचा निर्णय घेण्यास भाग पाडले.

शेतकर्‍यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल नवापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी फटाके फोडून राज्यातील शेतकरी संघटनेच्या सर्व नेत्यांचे आभार मानले.

सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास सुकाणू समिती पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवेल त्या आंदोलनाला नवापूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा पाठींबा राहील असे मत माजी जि.प. अध्यक्ष भरत गावित यांनी व्यक्त केले.

 

 

 

 

LEAVE A REPLY

*