नाशिकच्या ‘प्रेरणा’ची भारतीय लेग क्रिकेट संघात निवड

0
नाशिक : नाशिकच्या प्रेरणा राणेची भारतीय लेग क्रिकेट संघामध्ये या खेळाडूची निवड करण्यात आली आहे. प्रेरणाची निवड तिच्या मागील उत्कृष्ट कामगिरी बघुन करण्यात करण्यात राष्ट्रीय महासचिव मा. जे.पी.वर्मा (दिल्ली) व राष्ट्रीय सहसचिव मा.निलेश राणे (नाशिक) आणि महाराष्ट्र लेग क्रिकेट सचिव अशोक घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

भारतीय लेग क्रिकेट महासंघ आणि नेपाळ लेग क्रिकेट संघ आणि एस.एस.सी.ए.एफ.इंडिया आणि नेपाळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणारी भारत विरुद्ध नेपाळ आंतरराष्ट्रीय लेग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन काठमांडू (नेपाळ) येथे ६ जून ते ८ जून २०१७ या दरम्यान करण्यात आल्याची माहिती भारतीय लेग क्रिकेट महासंघाचे राष्ट्रीय महासचिव मा.जे.पी.वर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रेरणा नेपाळला २ जूनला रवाना होणार आहे. प्रेरणा ही नेपाळमध्ये भारतीय लेग क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राज्यातील क्रीडा संघटनांनी तिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

LEAVE A REPLY

*