नाशिककर डॉ. श्रीनिवास यांनी केली अमेरिकेतील ५ हजार किमीची सायकल स्पर्धा पूर्ण

0

नाशिक, ता. २६ : अमेरिकेतील रॅम अर्थातच रेस ॲक्रॉस अमेरिका ही सर्वात मोठी ४८०० कि.मी.ची शर्यत पूर्ण करण्यात भारताच्या लेफ्टनंट डॉ. श्रीनिवास गोकुळनाथ यांना यश आले आहे.‍

अमेरिकेतील १० राज्यातून समुद्र किनारे, वाळवंट, उंच पर्वतराजी अशा अवघड मार्गाने जाणारी ही शर्यत एकट्याने पूर्ण करणारे ते पहिलेच भारतीय ठरले आहेत.

मूळचे बंगळूरू येथील आणि सध्या नाशिकच्या आर्टिलरी रुग्णालयात डॉक्टर असलेले डॉ. श्रीनिवास यांनी ११ दिवस आणि १८ तास आणि  ४५ मिनिटे या वेळेत सातव्या स्थानावर ही स्पर्धा पूर्ण केली.‍

या स्पर्धेतील  ३१४३.९ मैल अंतर त्यांनी दररोज २५४ मैल या प्रमाणे पूर्ण केले.

 

LEAVE A REPLY

*