नाशिकची धनश्री बुद्धीबळात आघाडीवर; आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंना धूळ चारली

0
नाशिक : नाशिकची धनश्री राठी 6 पैकी 6 गुण मिळवून बुद्धीबळात आघाडीवर पोहोचली आहे.  सांगली येथे 13 ते 17 मे दरम्यान सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेत धनश्रीने  उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेत 6 पैकी 6 डाव जिंकून आघाडी घेतली आहे.

धंनश्रीला नुकताच शासनाचा गुणवंत पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. अतिशय चुरशीच्या स्पर्धेत धनश्रीने आतापर्यंत 6 डावात 6 आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंना पराभूत केले. तिचा 6 व्या फेरीचा सामना वृशाली देवधर बरोबर 4 तासापेक्षा जास्त चालला.

तरीही धनश्रीने एकाग्रता ठेवून सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. स्पर्धेच्या अजून 3 फेर्‍या बाकी असून स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याची तिला सुवर्णासंधी आहे. जाणोरी आंबे दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागातील असून सुद्धा धनश्रीने मिळविलेले हे यश उल्लेखनीय आहे.

या स्पर्धेत धनश्रीने अजिंक्यपद मिळवून नाशिकचे नाव उज्वल करण्यासठी सर्व अनुभवी प्रशिक्षक, सर्व पालक व बुद्धिबळप्रेमींनी तिला शुभेछा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

*