आईस्क्रीमचे आमिष दाखवून नाशिकरोडला चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार

0

नाशिक रोड : सिन्नर फाटा परिसरात राहणाऱ्या ५१ वर्षीय नराधम व्यापाऱ्याने चार वर्षांच्या बालिकेवर आईस्क्रीमचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना नाशिकरोड परिसरात घडली. नाशिकरोड परिसरातील ओढा रोड येथे राहणाऱ्या चार वर्षांची बालिका तिच्या आईवडिलांसोबत राहते.

दुपारी घरी कोणी नसतांना नराधम व्यापारी सुभाष झवर याने आईसक्रीम देतो असे सांगून बालिकेला घरी आणले त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. मुलगी प्रचंड घाबरली होती, बालिकेच्या आईला संशय आल्यानंतर या प्रकारचा उलगडा झाला.

याप्रकरणी पिडीत बालिकेच्या आईने नराधम सुभाष झवरविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संशयितावर भा. द. वि. कलम ३७६ सह बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*