आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकचे खेळाडू चमकले

0

नाशिक ।  इंडीयन रूरल ऑलिम्पिक असोसिएशन आणि नेपाळ रूरल ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेपाळ येथे आयोजित आंतरराष्ट्रीय ग्रामीण ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. स्पर्धेमध्ये व्हॉलीबॉल, कब्बडी, लेग क्रिकेट, फुटबॉल, ऐथलेटिक्स आदी क्रीडाप्रकाराचा समावेश होता.

स्पर्धेत महाराष्ट्रातील प्रेरणा राणे, प्रियंका शेवाळे, राजश्री चांदोरकर, राज पवार, महेश कुवर, विराज डबरे, सचिन सोनवणे, योगेंद्र दिवाण, टी. वैशाख, कृष्ण यादव, प्रणव हंचनाळे, नितीन नंदीवाले, अविनाश लोखंडे, सुबोध टिळक, रितेश पवार, विशाल लोंढे, अभिषेक माळी, कमलेश कोठावदे, विशाल मालगावे, वेदांग भोईर, अर्जुन विशे, अरचीत जराटे, प्रथमेश पाटील यांचा समावेश होता.

त्यात नाशिकच्या प्रेरणा राणे, राज पवार, सचिन सोनवणे, योगेंद्र दिवाण, प्रियंका शेवाळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघासाठी आपले मोलाचे योगदान दिले. स्पर्धेत भारतीय संघाने कब्बडी, क्रिकेट, व्हॉलीबॉल मध्ये विजय मिळवला तर फुटबॉल संघ उपविजेता ठरल्याची मातिही राष्ट्रीय सहसचिव निलेश राणे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*