नाशिक जिल्हा परिषदही NDCC वर गुन्हा दाखल करणार

जिल्हा बँक अध्यक्ष, मुख्याधिकारी हाजीर हो!

0
नाशिक : महावितरणनंतर जिल्हा परिषदेनेही जिल्हा बँकेवर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केल्याने आर्थिक दिवाळखोरीत असलेल्या जिल्हा बँकेच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेचे जवळपास 140 कोटी रुपये बँकेकडे अडकले असल्याने अनेक विकासकामे आणि देयके रखडली आहे. जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी बँकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

त्यावर याबाबत शासनाला अहवाल पाठवला असून बँकेवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सुचक वक्तव्य मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

तसेच 11 मे रोजी होणार्‍या सर्वसाधरण सभेसाठी जिल्हा बँक अध्यक्ष आणि मुख्याधिकार्‍यांना उपस्थित राहावे असाही निर्णय यावेळी सभागृहाने घेतल्याने जिल्हा बँकेच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*