सावधान ! वाहतुक पोलिसांची नजर आता चारचाकींवर; आजही जॅमर बसवले

0

नाशिक, ता. ३० : रस्त्यावर किंवा नो पार्किंगमध्ये तसेच वाहतुकीला अडथळा येईल अशा पद्धतीने वाहन पार्क केले, तर त्याच्यावर जॅमरची कारवाई होऊ शकते.

शहरातील महात्मा गांधी मार्ग, सांगली बँक चौक, नेहरू उद्यान परिसर, सरकारवाडा परिसर या परिसरात आज पुन्हा वाहतुक पोलिसांनी बेशिस्त पार्क केलेल्या चारचाकी वाहनांवर कारवाई केली.

वाहतुक शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक आदी ४० कर्मचाऱ्यांचा ताफा आज महात्मा गांधी रोडवर उतरल्याचे पाहायला मिळाले.

या पथकाने अनेक बेशिस्त कारचालकांच्या गाड्यांना जॅमर लावले, तसेच त्यांच्याकडून दंडही वसूल केला. रिक्षाचालकांवरही कारवाई करण्यात आली.

यासंदर्भात उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील म्हणाले, की यापूर्वी पार्कींगसंदर्भात केवळ दुचाकी वाहनांवरच कारवाई होत होती. मात्र आता चारचाकी वाहनांविरोधातही कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

आगामी काळातही ही मोहीम सुरू राहणार असून वाहनचालकांनी शिस्तीचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान दुपारी ही कारवाई झाल्यानंतर महात्मा गांधी रस्ता मोकळा झाल्याचे चित्र होते. या कारवाईचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून पोलिसांनी नियमितपणे अशी कारवाई करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

*