वेतनासाठी शिक्षकांचा विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा डाव

0
नाशिक : शहरातील व्ही. एन. नाईक महाविद्यालय येथे विविधी शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, खासगी शिक्षण संस्था चालक संघटना यांची शिक्षकांचे वेतन तसेच आंदोलन याबाबत बैठक आज आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत सुरुवातीला दोन तास विविध मुद्यांवर चर्चा झाली खरी परंतु खासगी संस्था चालक संघटना राज्य अध्यक्ष विजय नवल पाटील हे बोलण्यासाठी उभे राहिले असता शशांक मदाने यांनी वेतनाचा मुद्दा उपस्थित करत वादाला तोंड फोडले.

त्यांची री ओढत अन्य संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले. आधी पगाराचे बोला नंतर आंदोलनाचे पाहू असा पवित्रा सर्वानीच घेतल्याने विजय नवल पाटील यांना काढता पाय घेत तुम्ही तुमचे ठरवा आमचा पाठींबा तुम्हाला राहील अशी भूमिका घेत व्यासपीठ सोडले. नंतर बराच वेळ या पदाधिकार्यांमध्ये बाचाबाची सुरु राहिली त्यांनी माध्यमांवरही आपला रोष व्यक्त केला.

 

LEAVE A REPLY

*