उष्णतेवर मात करणारे थंडगार ताडगोळे नाशिकमध्ये दाखल

0

देशदूत डिजिटल

नाशिक, ता. १६ : दिसण्याला बर्फाच्या खड्याप्रमाणे पाणीदार आणि चवीला गोडसर व कोवळ्या नारळाच्या खोबऱ्यासारखे असलेले ताडगोळे नाशिकच्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत.

कॉलेजरोड, गंगापूररोड या परिसरात हे ताडगोळे मिळत असून २० ते ३० रुपयांना एक ताडगोळा याप्रमाणे विक्रीला उपलब्ध आहेत.

ताडाच्या झाडापासून ताडगोळे उपलब्ध होतात. कोकण, कर्नाटक, तमिळनाडू या परिसरात उन्हाळ्यात त्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते.

उष्णतेच्या विकारांवर उपयुक्त, पोटाला थंडावा देणारे, सारक, ऊर्जा देणारे असे हे पाणीदार फळ असल्याने कोकणपट्टीत त्याचे आवर्जून सेवन केले जाते.

नाशिकमध्ये दाखल झालेले ताडगोळे पालघरमधून आलेले आहेत. त्याचे विविध औषधी उपाय आहेत.

उष्माघातापासून बचाव होण्यासाठी ताडगोळे आवर्जून खाल्ले जातात. विशेषत: कोकणात बाहेर जाण्यापूर्वी लहान मुलांना एक ताडगोळा अवश्य दिला जातो.

ताडाच्या झाडापासून निरा काढली जाते व पुढे तीच आंबवून तिची ताडी बनते. उष्णतेच्या विकारांवर थंड समजली जाते.

त्याचप्रमाणे मूत्राशय किंवा अन्य उष्णतेच्या विकारांवर ताडगोळ्यांचा उपयोग होतो. इंग्रजीमध्ये त्याला आईस ॲपल म्हणून ओळखतात.

मात्र प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यावर सदी, खोकला आणि जुलाबही होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ताडगोळ्यांच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.

LEAVE A REPLY

*