‘महाराष्ट्र मिशन 1 –मिलीयन’  मध्ये नाशिकचे हजारो विद्यार्थी खेळले फुटबॉल

0

नाशिक,  ता. १५ : शहरातील शिवाजी स्टेडियमवर सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण असून शहर व जिल्ह्यातीलहजारो  विद्यार्थी फुटबॉलपटूंचे येथे आगमन झाले आहे.

येथे फुटबॉलचे तीन मैदाने करण्यात आली असून मुले आणि मुलांनी आज येथे फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. याशिवाय नाशिक शहर व जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये आज फुटबॉल खेळण्यात विद्यार्थी गर्क आहेत.

भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात आज १५ सप्टेंबरला एकाच दिवशी १० लाख पेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळत आहेत.

उद्या सकाळी ९ वाजता मुंबई जिमखाना, फोर्ट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र मिशन 1 –मिलीयन’ या फुटबॉल खेळाच्या महोत्सवाचे उद्घाटन झाले.

राज्यातील सर्व शाळांमध्ये फुटबॉल खेळून महाराष्ट्रात फुटबॉल मिशन एक मिलियनच्या निमित्ताने महाराष्ट्र फुटबॉलमय होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फिफा अंडर 17 विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने (FIFA U-17 World Cup India 2017)  देशात १ कोटी १० लाख लोकांनी फुटबॉल खेळावे अशी कल्पना मांडली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी ‘महाराष्ट्र मिशन 1 –मिलीयन’ ची घोषणा केली आहे.

मुलांनी इ-गॅझेट पासून दूर राहावे आणि मैदानावर येवून फुटबॉल खेळाचा आनंद लुटावा हा या उपक्रमामागे प्रमुख उद्देश आहे.

त्यासाठी मुलांनी अधिक वेळ मैदानावर द्यावा यासाठीच फुटबॉल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तर  शिक्षण विभागाने १५ सप्टेंबर हा दिवस Non-Instructional Day दिला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी मैदानावर खेळायला किंवा खेळ पाहायला उपस्थित राहतील.

दरम्यान बॉम्बे जिमखाना येथे आठ वेगवेगळे सामने होत आहेत. मुंबई जिमखाना येथे मुलींचा संघ, मुलांचा संघ, मुंबईचे डबेवाले, क्रीडा पत्रकार विरुध्द राजकीय पत्रकार, नॅशनल ब्लाईंड असोसिएशन विद्यार्थी, पालघर येथील आदिवासी संघ असे फुटबॉलचे सामने खेळले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

*