नाशिक स्मार्ट सिटी कंपनी कडुन विरोधकांना डावलण्याचा प्रयत्न; कॉग्रेस – राष्ट्रवादी व अपक्षांचा आरोप

0
नाशिक । नाशिक महापालिकेचा समावेश केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात समावेश झाल्यानंतर याकरिता गठीत करण्यात आलेल्या नाशिक स्मार्ट सिटी कार्पोरेशन लिमीटेड कंपनी या स्पेशल पर्पझ व्हेईकल संचालक मंडळावर कॉग्रेस, राकाँ व अपक्षांना डावलण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांकडुन सुरू असल्याचा आरोप आता विरोधकांकडुन केला जात आहे. याच नाराजीच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 रोजी होणार्‍या संचालक मंडळाच्या बैठकीच्या दरम्यान अध्यक्ष सिताराम कुंटे यांना निवेदन दिले जाणार आहे.

नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्प अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या गार्ईडलाईननुसार लगेत स्पेशल पर्पझ व्हेईकल म्हणुन नाशिक स्मार्ट सिटी कार्पोरेशन लिमीटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळात महापालिका महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते यांच्यासह या पदाधिकार्‍यांच्या पक्ष वगळता शिल्लक पक्षांच्या पक्षीय बलानुसार उतरत्या क्रमाने दोन संचालक नियुक्त करावेत असे निर्देश आहे.

असे असतांना कॉग्रेस पक्षांकडुन गटनेते शाहु खैरे आणि राकॉ व अपक्षांकडुन गुुरमित बग्गा यांची नावे संचालक पदाकरिता महापौरांकडे पाठविण्यात आले आहे. मात्र यासंदर्भातील ठराव अद्यापही नगरसचिव विभागाकडुन प्रशासनाकडे गेलेले नाही. परिणाम अद्यापही खैरे व बग्गा यांना कंपनी संचालक मंडळात समावेश झालेला नाही. त्याच्याच सोबत सभागृह नेते दिनकर पाटील यांचा संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे.

स्मार्ट सिटी संचालक मंडळात बग्गा यांचा महापालिका कामकाज आणि स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेले नियमांचा अभ्यास असल्याने त्यांच्याकडुन कामकाजात अडथळे निर्माण होतील, यामुळे त्यांचा संचालक मंडळात समावेश करण्यास सत्ताधारी भाजपातील काही पदाधिकार्‍यांचा विरोध असल्याची चर्चा आता बाहेर आली आहे. बग्गा यांच्यामुळे खैरे यांची निवड रखडल्याची चर्चा आहे.

यासंदर्भात कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेसकडुन प्रशासनाकडे विचारणा केल्यानंतर आता संचालक मंडळात शहरातील तीन आमदार व खासदार यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असुन राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कालपव्येय करण्याचा प्रकार सुरू असल्याने कॉग्रेस, राकॉ व अपक्षात नाराजीचा सूर उमटला आहे.

LEAVE A REPLY

*