शिवसेनेच्या नाशिक अधिवेशनात खा. राजू शेट्टींचाही सहभाग

0

नाशिक, ता. १७ : येथे १९ मे रोजी शिवसेनेतर्फे शेतकरी अधिवेशन संपन्न होत असून त्यात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टीचाही सहभाग असणार आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी ही माहिती आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

जोपर्यंत राज्य सरकारकडून कर्जमुक्तीची घोषणा जोपर्यंत होत नाही, तो पर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांनी जाहीर केलेला संप फोडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नका, असा गर्भित इशाराही त्यांनी भाजपाला दिला.

जुलै महिन्यात याच प्रश्नावर विधीमंडळावर एक भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकार स्थिर राहावे म्हणूनच शिवसेनेने सरकारला पाठींबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*