सत्ताधार्‍यांना धक्का ; शेतकरी विकास पॅनलला सर्व जागा

0

नाशिक । दि.8 प्रतिनिधी – नाशिक तालुका शेतकी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत मोठा विजय मिळविला.

तर शेतकरी विकासच्या समोर असलेल्या आपला पॅनलला एकही जागा मिळविता आली आहे. या निकालाने माजी खा. देविदास पिंगळे, खा. हेमंत गोडसे यांच्यासह मात्तब्बरांनी तयार केलेल्या पॅनलला साफ नाकारत सभासदांनी शेतकी संघात परिवर्तन केले.

शेतकरी विकास पॅनलने नेते शिवाजी चुंबळे, निवृत्ती घुले, विष्णुपंत म्हैसधुणे, संपतराव सकाळे यांनी विजयानंतर मोठा जल्लोष साजरा केला.

रविवारी संघाच्या कार्यक्षेत्रातील 6 मतदान केंद्रांवर 6,950 मतदारांपैकी 4,146 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यात सोसायटी गटात 100 टक्के मतदान झाले होते.

निवडणुकीत आपला पॅनल विरुध्द शेतकरी विकास पॅनल यांचा मोठ्या चुरशीचा सामना झाला. याठिकाणी अनेक वर्ष देवीदास पिंगळे यांच्या गटाचे वर्चस्व होते. त्यामुळे याकडे सर्वाचे लक्ष लागुन होते.

या निवडणुकीत विजयी झालेल्यात शेतकरी विकास पॅनलचे (सोसायटी गटात) पोपट चव्हाण (मते 42), भाऊसाहेब ढिकले (38), दौलतराव पाटील (45), उत्तमराव पेखळे (44), खंडेराव पेखळे (43), भाऊसाहेब भावले (47), दिनेश म्हस्के (45), भाऊसाहेब शिंदे (40) हे विजयी झाले.

या गटात 77 मतदारापैकी सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावला, मात्र यात 3 मते अवैध ठरले.

तसेच वैयक्तीक मतदार संघात विजयी झालेल्यात शेतकरी विकास पॅनलचे प्रकाश कांडेकर (मते 1897), संजय पिंगळे (1976), प्रभाकर माळोदे (1997), बाळकृष्ण हांडोरे (2117) हे उमेदवार विजयी झाले.

यात झालेल्या 3884 मतदानात 195 मते अवैध ठरली. तर महिला राखीव गटात मंदाबाई थेटे (2198) व मिराबाई लभडे (2099) शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी ठरले.

या गटात झालेल्या 4005 पैकी 151 मते अवैध ठरली.

त्याचबरोबर इतर मागास प्रवर्गातून शेतकरी विकास पॅनलचे तुकाराम पिंगळे हे 2069 मते मिळून विजयी झाले. या गटात झालेल्या 3927 मतापैकी 206 मते अवैध ठरले. त्याचबरोबर भटक्या विमुक्त जाती – जमाती विशेष मागास व प्रवर्गात शेतकरी विकास पॅनलचे प्रल्हाद काकड हे 2128 मते मिळून विजयी झाले. या गटात झालेल्या 3926 मतापैकी 230 मते अवैध ठरली.

तर अनुसूचित जाती – जमाती गटातून शेतकरी विकास पॅनलचे सोमनाथ बेंडकोळी हे 2145 मते मिळून विजयी झाले. यात 3933 मतापैकी 223 मते अवैध ठरली.
तर सत्ताधारी गटाच्या आपला पॅनलच्या पराभूत उमेदवारांना पुढील प्रमाणे मते पडली. यात सोसायटी गटात मधुकर कहांडळ (कंसात पडलेली मते 34), रावसाहेब कोशिरे (30), संजय तुंगार (36), भिमाजी थेटे (26), शंकर धनवटे (30), प्रविण नागरे (32), अशोक पाळदे (23), सुरेश मुळाणे,(27). वैयक्तीक मतदार गटात जयराम ढिकले(1786), बापुराव थेटे(1563), रामदास पिंगळे(1557), शांताराम माळोदे(1595), महिला राखीव गटात पुष्पाबाई थेटे(1775), राजुबाई मते (1539), इतर मागास प्रवर्ग राजेंद्र ढबले(1824), अपक्ष निलेश दिंडे (34). विमुक्त जाती – जमाती विशेष मागास व प्रवर्ग आपला पॅनलचे वाळु काकड (1766), अपक्ष मच्छिंद्र काकड (32) व अनुसूचित जाती – जमाती गटातून आपला पॅनलचे गोविंद दिवे (मते1788). या मतदान प्रक्रिया निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश शिंपी, सहा. निवडणुक निर्णय अधिकारी अशोक कातड, संदिप थेटे आणि योगेश कापसे यांच्या उपस्थित शांततेत पार पडली.

LEAVE A REPLY

*