भऊरला गावठी दारुभटट्या उध्वस्त; देवळा पोलिसांची कारवाई

0
भऊर | आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास देवळा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गावठी दारुच्या भटट्या उध्वस्त केल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जागेवरती कुणीच व्यक्ती न सापडल्याने कुणासही अटक करण्यात आली नाही.

गावात अचानक पहाटे पोलिसांच्या आगमनाने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले होते. इतक्या पहाटे पोलिस गावात का आले असावे असा प्रश्न पडलेला असतांना पोलिसांचा मोर्चा येथील गावठी दारूच्या भटट्याकडे वळून सर्वच भटट्या यावेळी पोलिसांनी उध्वस्त केल्या.

या कारवाईत २००० लीटर गावठी रसायन नष्ट करुन तेथील मडके, प्लास्टिक व लोखंडी ड्रम इत्यादी साहित्य भऊरचे पोलीस पाटील भरत पवार यांच्या समक्ष हस्तगत केले.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय दिवटे, पो.ना. मल्ले, पो.ना. गायकवाड, सावकार, सोनवणे, भामरे, जाधव, यांच्या टीमने केली.

तसेच अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देवळा पोलिसांनी दिली आहे.  या पुर्वीही राज्य उत्पादन शुल्क विभाग कळवण यांनी ६ मे ला कारवाई केली होती. मात्र तेव्हाही कुणी घटणास्थळी सापडले नव्हते.

LEAVE A REPLY

*