ऍक्टिव्ह एनर्जीकडून 9 जुलैला नाशिक रेनथाँनचे आयोजन

0

नाशिक : नाशिक शहराचे वातावरण आरोग्यासाठी लाभदायी आहे. तसेच वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात नाशिककर आता आवर्जून उपस्थित राहायला लागले आहेत. निरोगी शरीर ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम गरजेचा आहे. त्यामुळे व्यायाम मँरेथाँन क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या ऍक्टिव्ह एनर्जी संस्थेकडून जुलै महिन्यात मँरेथाँनचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

या मँरेथाँनमध्ये मिळणारा निधी सामाजिक कामासाठी वापरला जाणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख अनिरूद्ध अथनी दिली आहे. अथणी नावाजलेले मँरेथाँनपटूदेखील असल्यामुळे अनेक खेळाडूंना ते मार्गदर्शन करत असतात. सध्या अनेक धावपटू अथणी यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत.

नाशिक शहरात धावण्याच्या स्पर्धा जास्त आयोजित केल्या जात नाहीत त्यामुळे अनेक खेळाडू नाशिक सोडून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये स्पर्धेसाठी जातात. येथील खेळाडूंसाठी हक्काचे व्यासपीठ तयार व्हावे यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असल्याचे ते सांगतात.

यासाठी सर्व अद्यायवत सोयी सुविधा, टायमिंग चीप, टी शर्ट, मेडल, उपलब्ध करण्यात आले आहेत. मँरेथाँनच्या नोंदणी व टी शर्ट व लोगो च्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच शहरातील निवेक येथे पार पडला.

यावेळी नाशिक विभागाचे आयजी विनाँय चौबे तसेच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह आमदार सीमा हिरे  उपस्थित होत्या.

यावेळी धावण्यामुळे शरीर कशाप्रकारे निरोगी राहते याबाबत अनिरुद्ध अथनी यांनी नमूद करून स्पर्धा आयोजनामागचा हेतू स्पष्ट करतांना नाशिक जिल्ह्यातील विविध धावपटूना शहराबाहेर जावे लागू नये व धावण्याच्या व्यायामाची आवड शहरातील लोकांमध्ये उत्पन्न होऊन शहराचे आरोग्य चांगले राहावे हा हेतू या मँरेथाँनच्या अयोजनात असल्याचे त्यांनी नमूद केले.

नाशिक विभागाचे आयजी  विनाँय चौबे यांनी नाशिक शहरातील आरोग्याबाबतची जागरूकता अन्य कोणत्याही शहरापेक्षा जास्त असल्याचे सांगत शहरातील धावपटू व व्यायामपटू हे या शहराचे वैभव असल्याचे ते यावेळी म्हणाले.

 

नशिकचे जिल्हाधिकारी श्री राधाकृष्णन यांनी धावण्याचे व व्यायामचे महत्व विषद करून आयोजकांचे कार्याचे कौतुक केले. ते स्वतः धावपटू असल्याने या सारख्या स्पर्धांच्या आयोजनातून शहराला होणारा लाभ होणार असल्याचे नमूद केले.

स्पर्धेच्या आयोजनातून नाशिक मधील सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या NAB, माई लेले, व घरकुल या संस्थांना आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच स्पर्धेच्या टी शर्ट चेदेखील अनावरण करून संकेत स्थळाद्वारे स्पर्धेसाठी नोंदणीच्या लिंकचे उद्घाटन झाले.

स्पर्धेचा पाहिलं स्पर्धक म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी नोंदणी केली. या स्पर्धेच्या नोंदणीसाठी http://www.youtoocanrun.com/races/sws-nashik-rain-a-thon या संकेत स्थळावर नोंदणीचे अर्ज भरता येणार आहेत.

प्रत्यक्ष नोंदणीसाठी ActivNRG चे गंगापूर रोड येथील कार्यालय व जहागीरदार बेकर्सच्या नाशिकमधील सर्व दुकानांमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत नोंदणी करून सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*