बोलठाणला चोरट्यांनी लांबविले डिश टिव्ही दुरुस्तीचे साहित्य

0

बोलठाण (वार्ताहर) ता. १७ : बोलठाणला धाडसी चोरी झाली असून चोरट्यांनी दिनांक १५च्या रात्रीला 1:20च्या सुमारास सैय्यद हनीद सैय्यदअब्दुल यांच्या बाजारपट्टी तील घरात सुमारे 1 लाख रूपायचे ऐवज लंपास केला.

गुरुवारी रात्री बाजार पट्टी कड़े राहणाऱ्या सैय्यद हनीद अब्दुल यांच्या घरात काही अज्ञात चोरा नी रात्री 1:20 च्या सुमारास  प्रवेश करून  सोन्याचे २० ग्रॅम वजनाचे दागिने व त्यांच्या मुलगा डिश टीव्ही दुरुस्ती चे काम करतो त्याचे दुरुस्तीचे सामान घेऊन पोबारा केला. यावेळी त्यांची पत्नी घरात झोपलेली होती हे विशेष.

या पूर्वी सुद्धा चोरी घटना परिसरातून नवीन नाही काही दिवसा पूर्वी च दत्त मंदिरात चोरी झाली होती.

त्या आधी एकाच रात्री 5 दुकाने फोडून चोरानी सुमारे 1 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.

या चोऱ्यांचा अद्यापही तपास लागलेला नसताना पुन्हा चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या चोरीबाबत नांदगांव पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*