तलाठयांना लॅपटॉपऐवजी मिळाले प्रिंटर

0

नाशिक । दि. 12 प्रतिनिधी

राज्यात सगळया तलाठयांना लॅपटॉपसह प्रिंटर देण्याची घोषणा झाली. त्यानूसार , राज्यभर तलाठयांना प्रिंटर वाटपाचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात 355 तलाठ्यांना प्रिंटरही वितरित झाले. पण नुसतेच प्रिंटर मिळालेल्या तलाठ्यांना कामासाठी मात्र स्वताचे घरचेच लॅपटॉप वापरावे लागणार आहे.

शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय शासन जाणीवपूर्वक राबवित असून शेतजमिनीची प्रपत्रे संगणकावर उपलब्ध व्हावीत म्हणून आता प्रत्येक तलाठयाकडे लॅपटॉप उपलब्ध असला पाहिजे या दृष्टीने शासनाने तलाठयांना लॅपटॉप वाटपाचा निर्णय घेतला.

यासाठी तलाठयांना आंदोलनही करावे लागले. जिल्हयाला 532 तलाठी आणि तहसिल याप्रमाणे साधारण 652 लॅपटॉप व प्रिंटरची गरज आहे. पहिल्या टप्प्यात 355 प्रिंटर आले त्यांचे वाटपही झाले.

प्रिंटर वाटतांना जिल्हा यंत्रणेने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय या मुख्यालयापासून जवळ अंतर आहे. अशा तालुक्याऐवजी नाशिकपासून दूर असलेल्यांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे दूरच्या तलाठ्यांचे हेलपाटे वाचले. दुस़र्‍या टप्प्यात आणखी प्रिंटर येणार आहे.

तलाठी सवंगर्ताली कर्मचा़र्‍यांना शासनाने लॅपटॉप द्यावेत ही गेल्या दिड दोन वर्षांपासून तलाठ्यांची मागणी आहे. तलाठी संघटनेने या मागणीसाठी राज्यस्तरावर आंदोलन केली आहे.

मात्र अद्याप या मागणीची दखल घेतली गेलेली नव्हती. मात्र त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. गावागावच्या कामात सध्या तलाठ्यांना स्वताचे संगणक किंवा लॅपटॉप वापरावे लागत आहे. पण लवकरच शासनाकडून लॅपटॉप दिले जाणार आहे. तर सध्या मात्र केवळ प्रिंटरच मिळाले आहे.

LEAVE A REPLY

*