नाशिकच्या विद्यार्थ्यांनी बनवले महिला सुरक्षा ॲप

नाशिक, ता. १६ : महिलांच्या सुरक्षेसाठी नाशिकच्या रुपेश घुमरे, राहुल उफाडे आणि मुकेश वाघ  या विद्यार्थ्यांनी अँड्रॉइड ॲप बनविले असून लवकरच ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे.

हे सर्व विद्यार्थी येथील संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कॉलेजच्या कॉम्प्युटर इंजिनीरिंग विभागाचे आहेत. त्यांनी या ॲपला  “ रिव्हर्स कॉलिंग फॉर पर्सनल सेफ्टी’ असे नाव दिले आहे.

हे ॲप एन्ड्रोईड  कीट कॅट , लॉली पॉप , मार्श्मेमेलो , नोगट या व्हर्जन्स वर चालणारे असल्याने कोणत्याही मोबाईल वर सहज इन्स्टॉल करता येईल.

सदर ॲप इन्सस्टॉल केल्यानंतर एक ओनर आणि एक ट्रेकर हे ऑपशन्स येतात . महाविद्यालयात शिकणाऱ्या अथवा नोकरी करणाऱ्या मुलीचे वडील समजा ओनर झाले तर मुलगी स्वतःच्या संमतीने  ट्रेकर होवू शकेल. संकट प्रसंगी अथवा मुलीला घरी येण्यासाठी खूपच वेळ लागत असेल आणि मुलीला वडिलांनी केलेल्या फोनला काहीच प्रतिसाद मिळत नसल्यास मुलगी ज्या  स्थळी असेल तेथील प्रतिमा (इमेज) अप्लिकेशन व्दारे घेता येवू शकते,  मुलगी ज्या  स्थळी असेल तेथील  लोकेशन (एड्रेस) एस एम एस व्द्वारे घेता येतो.

“आजकाल या ना त्या कारणाने घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांची संख्या मोठी आहे. अशा वेळी त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. त्यांना विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या ॲपचा उपयोग होणार आहे. विद्यार्थी  लवकरात लवकर गुगल वर हे ॲप टाकण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

*