डुक्कर चावल्याने आश्रम शाळेतील बालक जखमी

0

नाशिक | दि. ८ प्रतिनिधी – डुकराने हल्ला करून चावा घेतल्याने आश्रमशाळेतील १३ वर्षीय बालक जखमी झाल्याची घटना कळवण तालुक्यातील ओतुर शासकीय आश्रमशाळेजवळ घडली. 

योगेश साहेबराव ठाकरे (१३, रा.मुकने, ता. कळवण) असे जखमी बालकाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार योगश हा ओतुर येथील शासकीय आश्रम शाळेत ७ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. सोमवारी सकाळी साडेआकरा वाजेच्या सुमारास आश्रमशाळेच्या आवारात आलेल्या डुकराने अचानक योगेशवर हल्ला करत त्याच्या उजव्या हाताच्या दंडाचा कडकडून चावा घेतला.
यावेळी इतर विद्यार्थी व जवळील नागरीकांनी धाव घेत त्यास सोडवले.  यामध्ये योगेश जखमी झाला असून त्यास त्याचा मामा नारायण बंंगाल यांनी ओतुर प्राथमिक केंद्र येथून जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.

LEAVE A REPLY

*