नाशिक शहर व जिल्ह्यात ईदचा उत्साह

0

नाशिक, ता. २६ :  नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी रमजान ईद अर्थातच ईद-उल-फित्र सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.‍

ईद निमित्त मुस्लिम बांधवांवर सर्वच धर्मियांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यानिमित्ताने धार्मिक सलोख्याने दर्शन घडत आहे.

आज सकाळी नाशिकच्या इदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी रमजान ईदचा नमाज अदा केला.  यावेळी  शहर-ए –खतीब यांची प्रमुख उपस्थिती होती.

नाशिकच्या महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, सभागृहनेते दिनकर पाटील, माजी महापौर विनायक पांडे, डॉ. हेमलता पाटील, पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्यासह अनेक मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.‍

काल चंद्र दिसल्याने ईदचा उत्साह सगळीकडे दिसून आला.

दरम्यान जिल्ह्यात मालेगावसह सर्व ठिकाणी ईदनिमित्त सामुदायिक नमाज अदा करण्यात आली. चांगल्या पावसासह देशाच्या शांतता व समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*