अखेर महिलांच्या टमरेल मोर्चामुळे गटविकास अधिकारी गावात दाखल

0

नांदगांव दि १० (प्रतिनिधी ) : दिनांक ८ ऑगस्ट रोजी तालुक्यातील हिसवळ बु येथे शौचालयाची वाताहत झाल्याने संबधित महिलांनी टमरेल मोर्चा काढून ग्रामपंचायत कार्यालयास टाळे लावले होते.

गटविकास अधिकारी येऊन आमच्या समस्या ऐकून घेणार नाही, तोपर्यंत कुलूप न काढण्याची भूमिका महिलांनी घेतली होती.

त्याची दखल घेत दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल बुधवारी गटविकास अधिकारी जे टी सुर्यवंशी यांनी भेट देऊन महिलांच्या तक्रारी ऐकल्या. त्यानंतर त्यांनी स्वच्छतागृहासंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामपंचायतीचे टाळे काढण्यात आले.

महिलांनी घेतलेल्या या आश्वासनात हिसवळ बु गांव हागदारीमुक्त करणे, गावातील सर्व सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता, देखभाल आणि पाणीपुरवठा करणे, घरगुती शौचालयांना शासन अनुदान देणे आदीचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*