समाधीपूर्वी निवृत्तीनाथांनी केले होते रामकुंडात स्नान; वारीतील नाशिकचे महत्त्व

0

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक, ता. १० : वारीसाठी पंढरपूरला प्रस्थान ठेवताना पिढ्यान पिढ्या संत निवृत्तीनाथांची पालखी नाशिकनगरीत दाखल होत असते.

टाळ मृदुंगाच्या गजरात नाशिकक्षेत्री दाखल होऊन मुक्काम करण्यामागे वारकऱ्यांकडून एक आख्यायिका सांगितली जाते.

ती अशी की, संत निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी श्रीक्षेत्र नाशिक येथे रामकुंडात स्नान केले होते. त्यानंतर त्यांनी श्री काळाराम मंदिराचे आणि श्री सुंदर नारायण मंदिराचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर येथे मार्गस्थ झाले.

पालखी सोहळ्यात सहभागी झालेले गिरणारे येथील वारकरी पुंडलिकराव थेटे यांनी देशदूत डिजिटलला ही माहिती दिली.

या पार्श्वभूमीवर वारीसाठी प्रस्थान ठेवताना पालखीच्या मुक्कामात नाशिक क्षेत्राचे महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*