नाशिक जिल्हा बँकेचे चेक नको रे बाबा !

0

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक, दि. १३ :एकीकडे संचालकांसह अध्यक्ष राजीनाम्याच्या तयारीत, तर दुसरीकडे हक्काचे पैसे मिळत नाही म्हणून शिक्षकांसह खातेदारांचा आंदोलनाचा पावित्रा.

आर्थिक अडचणीच्या स्थितीतून जात असलेल्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेला (एन.डी. सी.सी.) आता राष्ट्रीयीकृत बँकांसह इतर बँकाही नाके मुरडू लागल्या आहेत.

जिल्हा बँकेचे चेक स्वीकारायला या बँकांनी चक्क नकार दिला आहे.

गंगापूर रोड येथील एस.टी. कॉलनीजवळील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेने तसा बोर्डच बाहेर लावला आहे.

जिल्हा बँकेचे चेक वटत नसल्याने चेक वटणावळीत बँकेचा खर्च होतोच शिवाय हकनाक त्रासही सहन करावा लागतो, असा अनुभव आल्याने एसबीआयने ही भूमिका घेतल्याचे समजते.

जिल्हा बँकेचे चेक इथे टाकू नयेत तसेच आहे ते पूर्वीचे चेक घेऊन जावेत असा बोर्ड लावल्याने निदान चेकद्वारे तरी आपले पैसे ट्रान्सफर करता येतील या भाबड्या आशेत असलेल्या खातेदारांचा मात्र हिरमोड होत आहे.

 

 

LEAVE A REPLY

*