मुस्लिम महिलांकडून भारतीय जवानांना ‘रक्षाबंधन’

0
जुने नाशिक (फारूक पठाण) । पोलीस अधिकारी व कर्मचारी चोवीस तास काम करून कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवतात. त्याचप्रमाणे महिलांचीदेखील सुरक्षा एक भाऊ म्हणून ते करीत असतात.

पोलिसांमुळे महिला निर्भयपणे बाहेर पडतात व स्वत:ला सुरक्षित समजतात. म्हणून आजचे रक्षाबंधन शहरातील मुस्लिम महिलांनी    भारतीय लष्कराचे जवान,शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना रक्षाबंधन करण्यात आले.

प्रभाग 14 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका समीना मेमन, नगरसेवक सुफी जिन व सॅव्ही महिला महाविद्यालयाच्या श्रुती भुतडा यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

नगरसेविका मेमन मागील काही वर्षांपासून हा उपक्रम राबवीत असून त्यास शहरात उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ व बहीण यांच्यातील पवित्र नात्याला अधिक मजबूत करणारा आहे.

ज्याप्रमाणे ईद, दीपावली आदी सण हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रितपणे साजरा करतात त्याचप्रमाणे रक्षाबंधनचा सणदेखील साजरा होतो. यामुळे एकतेचा अनोखा संदेश जातो. त्यामुळे हा उपक्रम राबवीत असल्याचे नगरसेविका मेमन म्हणाल्या.

LEAVE A REPLY

*