नाशिक मनपाचे प्रीपेड स्मार्ट कार्ड सुरू; ४५ सेवा झाल्या ऑनलाईन

0

नाशिक, ता. १६  : नाशिक महापालिकेतर्फे नागरिकांना कर भरण्यासाठी प्रीपेड स्मार्ट कार्डे देण्यात येणार असून स्वातंत्र्यदिनी या कार्डचे उदघाटन झाले.

यस् बँकेच्या सौजन्याने तयार केलेल्या या कार्डद्वारे मनपाचे सर्व कर भरण्याबरोबरच खरेदीसाठीही उपयोग होणार आहे.

हे कार्ड मोफत असून त्यासाठी केवळ  केवायसीची पूर्तता करावी लागणार आहे. सुरवातीला नियमित कर भरणाऱ्या ५० हजार नागरिकांना ते देण्यात येईल.

महापालिकेच्या ४५  सेवा ऑनलाईन झाल्या असून त्यांचा घरबसल्या लाभ घेता येणार आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावरील ई सुविधावर क्लिक  केल्यास या सुविधांचा लाभ घेता येईल.

मालमत्ता कर, जन्म मृत्यू दाखले, अग्निशमन परवाने, नळजोडणी, तक्रार आदी सुविधांचा लाभ घेता येणार आहे. मात्र त्यासाठी आपले, नाव, पत्ता,  फोनक्रमांकासह संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.

 

LEAVE A REPLY

*