मारुती सुझुकी डिझायरचे पदार्पणातच ४४ हजारांचे बुकींग; नाशिककरांचीही पसंती

0

नाशिक, ता. २३ : नव्या वैशिष्ट्यांसह आणि आकर्षक प्रकारात भारतीय रस्त्यांवर अलिकडेच दाखल झालेल्या मारुती सुझुकी डिझायर कारने पदार्पणातच ४४ हजारपेक्षा जास्त बुकींगचा मान पटकावला आहे.

या कारला आता ८ आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागतेय. नाशिक शहर आणि जिल्हयातही या कारकडे वाहनप्रेमींचा ओढा वाढत असून बुकींगसाठी येथे गर्दी होत आहे.

सुझुकीच्या डिझायर नाममुद्रेची वाहनप्रेमींमध्ये असलेल्या लोकप्रियतेमुळे हे घडल्याचे सांगितले जातेय. नव्या स्वरूपातील डिझायरची किंमत  ५.४५ लाख ते ९.४१ लाख (एक्स शो रूम दिल्ली) इतकी आहे.

नवीन डिझायरमध्ये केलेल्या बदलांमुळे याच प्रकारातील इतर स्पर्धक कारपेक्षा ती जास्त आकर्षक ठरली आहे. नव्या मॉडेलमध्ये ४० मि.मी. जास्त रूंदी देण्यात आली आहे. तसेच व्हिलबेस २० मि.मी. लाँगर देण्यात आला आहे. त्यामुळे या गाडीची केबिन जास्त आरामदायी आणि मोकळी झाली आहे.

हिच्या ZDI  आणि ZXi या टॉप मॉडेलमध्ये ड्रायव्हरसमोरच्या डॅशबोर्डला टचस्क्रीन असलेली एन्टरटेंटमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. ॲपर कार प्ले, अँड्राईड ॲटो मिरर लिंक सपोर्ट देण्यात आली आहे. शिवाय कमी किंमतीच्या मॉडेलमध्येही आकर्षक सुविधा देण्यात आल्या आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने एबीएस, ईबीडी, ब्रेक असिस्ट, चाईल्ड सीट माऊंट आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.

अंतरंग आणि बाह्यरंगात उजवी असलेल्या या कारचे पेट्रोलवर चालणारे मॉडेल २२ किमी. प्रति लिटर तर डिझेल मॉडेल २८.४८ कि.मी. प्रति लिटर इतके ॲव्हरेज देते असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.

ॲलॉय व्हिल्स, ऑटो गिअर्स, ट्युबलेस टायर्स आदी अनेक वैशिष्ट्‌ये या कारमध्ये समाविष्ट आहेत.

LEAVE A REPLY

*