नांदगाव हिसवळबारीत ५६ खेडींची जलवाहिनी फुटली

0

नांदगांव (प्रतिनिधी) दि. ८ :  नांदगांवहून हिसवळ,खु, हिसवळ बु, मांडवड असे जाणारे ५६ खेडी जलवाहिनीला हिसवळ बारीत गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.

सुमारे दोन तासाहून आधिक काळ हे पाणी वाया गेले. येथील नागरिकांच्या तक्रारीवरुन सदर पाणी बंद करण्यात आले. या प्रकारामुळे १५ दिवसांनी एकदा होणारा पाणीपुरवठा रखडला आहे.

५६ खेडी योजनेचे या भागातील पेट्रोलीगचे  अधिकारी हे जलवाहिनीला पाणी सोडताना या बाबीकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे जलवाहिनी फुटून पाणी वाया जाते. हे तसे या विभागाच्या अंगवळणी पडले असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.

तसेच जलवाहिनीकडे अधिकारी फिरकले नाहीत, त्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीला चालढकल होत आसल्याने थोडक्यात हि दुरुस्ती होत नसल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याच्या तक्रारी आहेत.

LEAVE A REPLY

*