नाशिक जिल्हा दूध संघावर प्रशासक; संचालकमंडळ बरखास्त

0

नाशिक । दि. 4 प्रतिनिधी
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पुनर्वसनासाठी मिळलेल्या शासकीय निधीचे नेमके काय केले, याचा हिशेब दिला नसल्याने जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची कार्यकारणी बरखास्त करून सहकार विभागाने तीन प्रशासक नियुक्त केले आहे.

अपात्र ठरवण्यात आलेल्या संचालकांमध्ये चेअरमन पंढरीनाथ थोरे, छाया काळे, शिवाजी बोराडे, योगेश पवार, भाऊसाहेब पाटील, हौशीराम घोटेकर, दिलीप शेवाळे, विनोद चव्हाण, नथुजी सूर्यवंशी, शरद लहरे, सुभाष निकम आदींचा समावेश आहे.

ज्या दूध संस्थेची संघाबरोबर नाळ जुळलेली आहे. तसेच त्या भागातील संचालक जर दूध संघावर असेल तर, त्या संस्थेने वर्षभरातील सुमारे 180 दिवस तरी दूध संघाला दिवसाला 50 लिटर दूध पुरवणे अपेक्षित असते.

मात्र, संघाच्या सदस्य असलेल्या सुमारे 350 सदस्य संस्थांपैकी फक्त 17 संस्था दिवसाला सुमारे 1200 लिटर दूध पुरवतात.

संघात केवळ 32 कर्मचारी कार्यरत आहे.त्यांच्यावर दरमहा सुमारे तीन लाख रुपये खर्च होतो.

असे असताना जिल्हा संघाने हिशेबाची रकम आणि खर्च केल्याची रकम नीट हिशेब दिला नसल्याने सहकार विभागाने संघाच्या संचालकांवर कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

*