नाशिक येथील सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीतील दोघेजण तडीपार

0
नाशिक | प्रतिनिधी : नाशिक पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ १ कार्यक्षेत्रातील सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

गंगापूर रोडवरील मल्हार खान झोपडपट्टीतील संतोष अनिल जगदाने (वय ३३) व बेथेलनगर शरणपुर येथील विशाल रजनीकांत शिरसाठ (वय ३३) यांच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्र बाळगणे, खंडणी वसूल करणे, दरोड्याची पूर्व तयारी करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर आहेत.

याबाबत परिमंडळ एक चे पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तडीपार प्रकरणाची चौकशी करून त्यांना नाशिक शहर पोलिस आयुक्तालय व नाशिक ग्रामिण हद्दीतून दोन वर्ष कालावधीतसाठी तडीपार केले आहे.

तडीपारीच्या काळात संतोष जगदाने हा ठाणे येथे तर विशाल हा पुणे येथे राहणार आहे.

LEAVE A REPLY

*