मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीची माफी मागावी – चित्रा वाघ

0

नाशिक । दि.9 । प्रतिनिधी-सरकारच्या ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीची पोलखोल झाल्यानंतर टीव्हीवरील एका मुलाखतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी या महिलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षांनी धमकावल्याचा गंभीर आरोप केला.

याची शहानिशा करण्यासाठी कळवणमधील मोहमुख गावात आम्ही जावून आलो. असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

जाहिरातीतील फोलपणा उघड झाल्याने खजिल झालेले मुख्यमंत्री आपला राग विरोधकांवर काढताना दिसत आहेत. एका बाजूला महिलांचा आम्ही सन्मान करतो, असे म्हणणारे मुख्यमंत्री दुसरीकडे खालच्या पातळीवर जावून राजकारण करताना दिसत आहेत.

त्यांचेच मंत्री गिरीश महाजन यांनी दारूच्या ब्रॅण्डला महिलांची नावे द्यावीत, असे वक्तव्य करून महिलांचा अपमान केला आहे. यासाठी आम्ही तीन दिवस ङ्गजोडे मारोफ आंदोलनही केले आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात माफी न मागितल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासही मागे पुढे पाहणार नाही, असेही वाघ यांनी सांगितले.

महिला आयोगाने गिरीश महाजन यांच्या वक्तव्याप्रकरणी गुन्हा का नोंदवला नाही, याचे उत्तर विजया रहाटकर यांनी द्यावे. कायद्यात याबाबत तरतूद असूनही का पावले उचलण्यात आलेली नाहीत ?

महिला आयोग हा केवळ नावालाच शिल्लक राहिल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारच्या ङ्गमी लाभार्थीफच्या शौचालय जाहिरातीत सहभागी असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील मोहमुख येथील फुनाबाई गुलाब पवार यांना धमकवण्याचे व त्यांच्यावर दबाव टाकल्याचे गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षासंदर्भात केले ते चुकीचे आहेत.

याच संदर्भात आज मी स्वत:, महिला उपाध्यक्ष डॉ.भारती पवार, जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, प्रदेश सचिव कामिनी जाधव यांनी फुनाबाई यांची भेट तेथील गावकर्‍यांसमोर भेट घेतली.

असा कुठलाच प्रकार राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षांनी काय, पण कुठल्या कार्यकर्त्याने केलेला नाही, असा खुलासा स्वत: फुनाबाई व गावकर्‍यांनी केला.

याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही पद्धतीची शहनिशा व खातरजमा न करता विरोधी पक्षातील महिला पदाधिकार्‍याची बदनामी केली आहे.

अशा पद्धतीने राज्यातील महिलांची बदनामी करणे हे राज्याच्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, असे वाघ म्हणाल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याच्या मुलाखतीचा व्हीडिओ तसेच फुनाबाईची भेट घेतल्यानंतरचा व्हीडिओ प्रसारमाध्यमांना दिला.

पत्रकार परिषदेच्या वेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, उपाध्यक्ष भारती पवार, संगिता पगार आदी उपस्थित होते.

 

 

 

LEAVE A REPLY

*