जिल्हा बँक अन् सरकारवर गुन्हे दाखल करणार;स्वाभिमानीचा इशारा

0

नाशिक / खरीप हंगामात बँक पीककर्ज देवू शकणार नाही अशी थेट घोषणा नाशिक जिल्हा सहकारी बँक अध्यक्षांनी केली होता.

मात्र ऐन खरीप हंगामात पीककर्जाचा पुरवठा होत नसल्याने शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे.

यामुळे पीक कर्ज न मिळाल्याने जर शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या तर जिल्हा बँक आणि राज्य सरकारवर खुनाचे गुन्हा दाखल करणार, अशी आक्रमक भूमिका स्वाभिमानी संघटनेने घेतली आहे.

नोटबंदीच्या काळात जुन्या नोटा बदलून न मिळाल्याने बँकेला 342 कोटींचा फटका बसला आहे.

मागील वर्षीची पीककर्ज वसूली केवळ पाच टक्के झाली असून बँकेतील अनागोंदी कारभारामुळे बँकेकडे खेळत्या भांडवलाची वानवा आहे.

त्यामुळे खरिप हंगामात बँक पीककर्ज देवू शकणार नाही अशी थेट घोषणा जिल्हा बँक अध्यक्षांनी केली. त्यांनी सगळी जबाबदारी सरकारवर ढकलून हात झटकले आहेत.

तर सध्या जिल्हा बँकेची कर्जवसूली प्रक्रीया ठप्प आहे. मागील हंगामातील केवळ पाच टक्केच कर्ज वसूली झाल्याने जिल्हा बँकेकडे पुरेसा निधीच उपलब्ध नाही.

त्यामुळे नवीन पीक कर्ज देण्यास जिल्हा बँकेने असमर्थता दर्शवली आहे. त्यात भरीत भर म्हणून जिल्हा बँकेने शेतकर्‍यांना जप्तीसंदर्भातल्या नोटीसाही पाठवल्या आहेत.

या बँकेकडे जवळपास 600 कोटींचा चलन तुटवडा आहे. मुळात बँकेवर ओढवलेल्या या परिस्थितीला बँक अध्यक्षांपासून सर्वच संचालक जबाबदार असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

जर या परिस्थितीमुळे शेतकर्‍यांची आत्महत्या झाली तर जिल्हा बँक संचालक आणि सरकार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईपर्यंत आंदोलन करण्याता इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

LEAVE A REPLY

*