आता नववी, दहावीसाठी 35 मिनिटांची तासिका

0

येवला । दि. 4 प्रतिनिधी
या शैक्षणिक वर्षापासून नववी व दहावीसाठी प्रथमच पाठ्यपुस्तके व अभ्यासक्रमात फेररचना केली आहे. तसेच नववीचा अभ्यासक्रम व पुस्तके बदलणार असून, पहिली ते दहावीच्या वर्गांसाठीच्या तासिका 30 ऐवजी 35 मिनिटांची करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

तर पहिली तासिका 40 मिनिटांची असणार असून परिपाठाला 10 मिनिटे स्वंतत्र असणार आहे. तर नववीचा आयसीटी हा विषय स्वतंत्र न राहता त्याचा समावेश सर्व विषयांमध्ये केला आहे. त्यामुळे आता स्वतंत्र पाठ्यपुस्तक राहणार नाही.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने यासंदर्भातील निर्णय दोन वेगवेगळ्या परिपत्रकांत दिला असून सर्वच वर्गांसाठी आठवड्याला 45 तासिका निश्चिरत केल्या आहेत. सोमवार ते शुक्रवार पर्यत रोक आठ व शनिवारी पाच तासिका घेणे अपेक्षित असून यासाठी मुख्याध्यापकांना योग्य तो बदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

पहिली ते आठवीसाठीही आठवड्याला 35 मिनिटांच्या 45 तासिका निश्चित करण्यात आल्याचे एका परिपत्रकात म्हटले आहे. दहावीच्या वेळापत्रकात यापूर्वी 30 मिनिटांच्या 50 तासिका आठवड्याला होत्या. आता त्याऐवजी 35 मिनिटांच्या 45 तासिका एका आठवड्याला असतील.

आता मराठीला सहा, हिंदी सहा, इंग्रजी सहा, गणित सहा, समाजशास्त्रचे सात (यात इतिहास, राज्यशास्त्रचे चार तर भूगोललाचे तीन), आरोग्य व शारीरिक शिक्षनाचे दोन, स्वविकास व कलारसास्वाद दोन, संरक्षणशास्त्र/एम. सी. सी./स्काउट/गाईड/एनसीसी/नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा यांचे दोन तशिका असणार आहे.

तृतीय भाषेच्या दोन तशिका यंदापासून कमी होणार आहेत.यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ज्या शिक्षकांची नियुक्ती ज्या वर्गांसाठी केलेली असेल, त्यांना त्याच वर्गांना शिकविणे बंधनकारक केले आहे.

अनावश्यक विषय केले बंद
काही विषय कागदावर जास्त अन कृतीत कमी असल्याचे मंडळाच्या निदर्शनात आल्याने आता त्यांची सुट्टी करण्यात आली आहे. आयसीटी व अर्थशास्त्र हा स्वतंत्र विषय ठेवलेले नाहीत.तर भूगोल व गणित या दोन्ही विषयात अर्थशास्त्रविषयक क्षमता व आशय यांचा समावेश केलेला आहे.

त्याचबरोबर व्यक्तिमत्त्व विकास, कार्यानुभव, समाजसेवा व व्यवसाय मार्गदर्शन हे विषय बंद केले आहेत. त्याऐवजी स्व-विकास व कलारसास्वाद’ या विषयाचा एकच विषय करण्यात आला आहे.शालेय प्रमाणपत्र विषयात संरक्षणशास्त्र हा विषय राहील.

त्यात पूर्वीप्रमाणे एमसीसी (फक्त नववी), स्काऊट गाइड, नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा, एनसीसी हे विषय पूरक राहतील. शीक्षण व्यवसायाभिमुख व्हावे, यादृष्टीने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत नववी व दहावी स्तरावर एकूण दहा विषय सुरू करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

*