‘एक्सॉटिक स्पा’वरील धाडीनंतर परेश सुराणा अवतरला फेसबुकवर

0

नाशिक, ता. २५ : काल कॉलेजरोडवरील हॉलमार्क चौकातील एका व्यावसायिक इमारतीत सुरू असलेल्या एक्सॉटिक स्पावर पोलिसांनी छापा मारल्यानंतर स्पाचा मालक परेश सुराणा पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

मात्र या संदर्भात माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र काही तासांतच एक परेश सुराणा फेसबुकवर अवतरल्याचे दिसून आले.

त्यामुळे  पोलिसांना हवा असलेला हा तोच सुराणा का? की वेगळा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एका फेसबुक ग्रुपवर  बातमी प्रसिद्‌ध झाल्यानंतर अनेकांच्या त्यावर प्रतिक्रिया आल्या. त्यात परेश सुराणा नावाच्या एका प्रोफाईलवरून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

माध्यमांना उद्देशून या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, ‘ जर तेथे काही चुकीचे घडत होते, तर पोलिसांनी स्पाच्या आतील सीसीटीव्ही कॅमेरे का फोडले? सत्य काय ते जगासमोर यायला पाहिजे असेही त्यात म्हटले आहे.

या प्रोफाईलची पडताळणी केल्यावर त्यात तिशीच्या आसपास वय असलेल्या युवकाचे ते दिसून आले. त्यात अबाऊटमध्ये एका स्पाची च्या नावाची लिंक टाकण्यात आली आहे.

बुधवारी मध्यरात्री १२च्या सुमारास त्याने संबंधित प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित वृत्त

कॉलेजरोडवरील मॉलमध्ये चालायचे स्पाच्या नावाने अनैतिक व्यवसाय; पोलिसांचा छापा

LEAVE A REPLY

*