पहिणे येथे सहलीसाठी गेलेल्या नाशिकच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

0

त्र्यंबकेश्वर (विशेष प्रतिनिधी) | तालुक्यातील आज (दि.२६) दुपारी चार वाजेच्या सुमारास नाशिकहून सहलीसाठी गेलेल्या दोन इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या विद्यार्थ्यांची नावे संग्राम शिरसाठ (वय २४, रा. गंगापूररोड, नाशिक) व कौस्तुभ भिंगारदिवे (वय २६, राहुरी ता. राहता जि. नगर) अशी आहेत. नाशिकमधील एका महाविद्यालयात हे विद्यार्थी इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होते.

याबाबत अधिक वृत्त असे की, पावसाळ्यात त्र्यंबक परिसरात सहलीच्या निमित्ताने हे विद्यार्थी आले होते. पोहण्यासाठी येथील केटी बंधा-यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्नात दोघेही डोहात बुडाले.

सहलीसाठी साधरणता 5 ते 6 युवकांचा ग्रुप आला होता. पहिणे फाटा त्रिफुलीपासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या वळणात वाहने उभी करून नदीपात्रात असलेल्या डोहाच्या बाजुला बसून पार्टी केली.

त्यानंतर हे विद्यार्थी पोहण्यासाठी डोहात उतरले असता त्यापैकी एक बुडायला लागला. त्यानंतर दुसरा त्याला वाचवायला गेला व तो देखील बुडाला.

आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील रहिवाशी धावून आले. खडकवाडी येथील तरूणांनी या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. पोलीस पाटील अंबापुरे यांनी वाडीव-हे पोलीस ठाण्यास खबर दिली.

घटनास्थळी पोलीस पोहचले व पंचनामा करण्यात आला. ञ्यंबक शहरापासून अवघ्या 9 किमी अंतरावर हि घटना घडली आहे. दरसाल पावसाळयात येथे सहलींसाठी मोठी गर्दी होते.

LEAVE A REPLY

*