अभिमानास्पद : अमेरिकेतील ५ हजार किलोमीटरच्या शर्यतीत नाशिककर सायकलपटूंचा सहभाग

0

देशदूत डिजिटल

नाशिक, ता. १३ : सर्व नाशिककरांसह देशवासियांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी एक चांगली बातमी आहे.

अमेरिकेत लवकरच होणाऱ्या रेस अक्रॉस अमेरिका ( RAAM) या प्रतिष्ठेच्या सुमारे पाच हजार किलोमीटर अंतराच्या शर्यतीत चार नाशिककर सायकलपटू सहभागी होणार आहेत.

अमेरिकेतील सर्व समुद्रकिनाऱ्यांजवळून जाणाऱ्या आणि डोंगर दऱ्या, वाळवंट अशा विरुद्ध भौगोलिक स्थितीतून मार्गक्रमण करणारी ही सायकल शर्यत अतिशय अवघड समजली जाते.

मात्र तरीही नाशिककर सायकलपटूंनी जिद्द आणि हिंमतीच्या जोरावर ‘टिम सह्याद्री’ नावाने त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिकचे रोटरियन डॉ. राजेंद्र नेहते, डॉ. रमाकांत पाटील डॉ. संदीप शेवाले आणि डॉ. पंकज मार्लेशा यांचा या ‘टिम सह्याद्री सायकलिस्ट ’मध्ये सहभाग आहे. हे सर्व नुकतेच अमेरिकेत रवाना झाले आहेत.
स्पर्धेसाठी विमानतळावरून रवाना होताना टीम सह्याद्री सायकलिस्टचे स्पर्धक आणि सदस्य

अमेरिकेतील येथील समुद्र किनारपट्टीलगत असलेल्या मार्गावरून ही सायकल शर्यत जाणार आहे. १७ जूनला कॅलिफोर्निया येथून या शर्यतीला सुरुवात होऊन ॲनापॉलिस येथे समारोप होणार आहे.

या नऊ दिवसांच्या कालावधीत ते ४९५० किमी अंतर सायकलवरून कापणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे जवळचे १६ मित्रही त्यांना पाठिंबा देण्यासाठी जात असणार आहेत.

 

LEAVE A REPLY

*