रविवारी नाशिक सायकलिस्टची ‘राईड विथ डिग्निटी’

0
नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे दिव्यांगांसाठी तीनचाकी सायकल रॅली येत्या रविवारी (दि २१) रोजी आयोजित करण्यात आली आहे. ‘लाईव्ह विथ डिग्निटी’ म्हणजेच ‘प्रतिष्ठेसह जगा’ असा संदेश या रॅलीत देण्यात येणार आहे.

हाताने सायकल चालवून दैनंदिन कामे करणाऱ्या या खऱ्या खुऱ्या सायकलिस्टला नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या कुटुंबात सहभागी करून घेण्यात येणार आहे.

सहानुभूती नको, हवी असते ती प्रतिष्ठा, ती प्रतिष्ठा त्यांना मिळवून देण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन त्यांच्या सोबत आहेत असा विश्वास या रॅली द्वारे पटवून देण्यात येणार आहे.

सकाळी ७ वाजता राजीव गांधी भवनपासून सुरू होणारी ही रॅली पुढे मॅरेथॉन चौक – अशोक स्तंभ – मेहेर सिग्नल – सीबीएस – त्र्यंबक नाका – जिल्हा परिषद भवन ते ए टू झेड सायकल्स येथे समाप्त होईल. नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात येणार आहे.

सर्व दिव्यांग सायकलिस्टचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत या रॅली मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक सायकलिस्टतर्फे करण्यात येत आहे.

ही राईड यशस्वी करण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या प्रहार संघटनेचे दत्तू बोडके, कुतबी मर्चंट आदी प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

*